Wednesday, 9 September 2020

Friday, 4 September 2020

आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक

 प्रसिद्ध प्राणीतज्ञ निलीमकुमार खैरे यांचे आपल्या परिसरातील प्राणीविश्वाची ओळख करून देणारे पुस्तक.


ह्या पुस्तकाचा काही भाग खालील दुव्यावर वाचता येईल.
https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4751108473385147239&PreviewType=books

Friday, 21 August 2020

Kid's Primer (मराठी आवृत्ती)

Kid's Primer (मराठी आवृत्ती)

सारं काही मुलांसाठी -- शोभा भागवत

पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे
आणि
सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे.

आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. अशा वातावरणात मुलाचं मूलपण सांभाळण्याचं, जोपसण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.



ह्या पुस्तकाचा काही भाग वाचण्यासाठी खालील दुवा वापरा.

सारं काही मुलांसाठी


Wednesday, 15 July 2020

गूगल क्लासरूम

गूगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी १ लाख १८ हजार शिक्षकांची नोंदणी.
पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक नंतर अन्य शिक्षकांना शिकवतील.
असे करून सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.
पूर्ण बातमीचा दुवा :

https://www.lokmat.com/mumbai/registration-1-lakh-18-thousand-teachers-google-classroom-training-a309/



Wednesday, 24 June 2020

समजपूर्वक वाचन ०२ : कृष्णा नदी



मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावीत.
प्रश्न लिहू नयेत. केवळ प्रश्नक्रमांक आणि उत्तर लिहावे.

पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना वरील उतारा वाचून दाखवू नये किंवा उत्तरे शोधायला मदत करू नये.

समजपूर्वक वाचन ०१ : झाडाखालची पंगत

मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावीत. प्रश्न लिहू नयेत. केवळ प्रश्नक्रमांक आणि उत्तर लिहावे.

 ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीचे पाठ्यपुस्तक वाचून समजत असेल त्यांच्या पालकांनी ह्या विद्यार्थ्यांना वरील उतारा वाचून दाखवू नये किंवा उत्तरे शोधायला मदत करू नये.

अशाप्रकारचे इतर उतारे वाचण्यासाठी खालील दुवा पहा.
https://fliphtml5.com/klucq/ezlm/basic

Saturday, 20 June 2020

कोल्हा आणि द्राक्षे ( व्हिडियो)

हा व्हिडियो खालील दुव्यावर पाहता येईल.

कोल्हा आणि द्राक्षे

हा व्हिडियो पाहिल्यावर विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारता येईल :
कोल्ह्याने द्राक्षांची चव घेतली नव्हती तरीसुद्धा त्याने त्या द्राक्षांना आंबट का म्हटले असेल?

Friday, 12 June 2020

मराठी पालकांची अभिरुची

मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे
पण
हे घडायला पालकांनाही साहित्य आणि इतर कलांची आवड असली पाहिजे.

पालकांनाच जर वाचनाची आवड नसेल
आणि
केवळ टिव्हिवरच्या मालिका बघायला आवडत असतील
तर मुलांना वाचनाची आवड लागणे कठीण आहे.

रसिक पालकांनी 
खाली सुचवलेले फेसबुकवरचे  पान पहावे.
त्या पानावरच्या ज्या पोस्ट आवडतील त्या
पसंत ( लाईक) कराव्या
आणि
ह्या पानावरच्या पोस्ट तुमच्या फेसबुक खात्यात मिळत राहाव्या ह्यासाठी हे पानदेखील
पसंत ( लाईक) करावे.

अभिप्राय
https://www.facebook.com/rasik.network

दिनदर्शिका (कॅलेंडर) आणि अंकांची गंमत

मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी
खालील दुवा वापरून व्हिडियो बघावा आणि हा व्हिडियो बघून काय समजले , काय आवडले हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे.



दिनदर्शिकेमधील अंकांची गंमत

ह्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी मुलांना हा व्हिडियो समजावून सांगू नये. 
हा व्हिडियो बघून मुले आपणहून काय शिकतात ह्याचे निरिक्षण करावे.

हा व्हिडियो जर मुलांना दाखवता येणार नसेल तर
पालकांनी किंवा शिक्षकांनी हा व्हिडियो पहावा
आणि
कॅलेंडरचे एक मोठे पान कागदावर बनवून
ह्या व्हिडियोतली काही माहिती मुलांना समजावून सांगावी.


असे इतर व्हिडियो पहायला खालील संकेतस्थळाला भेट द्या.
http://www.arvindguptatoys.com/films.html

 

Thursday, 11 June 2020

चुळूक बुळूक (बालगीते)



मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी
ह्या पुस्तकातील बालगीते स्वतःहून वाचावी
आणि
कोणते बालगीत आवडले , का आवडले हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे.

ह्या वयोगटातील मुलांच्या पालकांनी मुलांना ही बालगीते वाचून दाखवू नयेत.

ही बालगीते वाचण्यासाठी कृपया खालील दुवा (लिंक) वापरा.
चुळूक बुळूक (बालगीते)

Tuesday, 9 June 2020

इसापनीतीमधील एक कथा



खालील दुवा निवडून सिंह आणि घोडा ही कथा वाचता येईल.

सिंह आणि घोडा


ही कथा खालील पुस्तकात आहे.

इसापनीती : २
लेखक : आनंद साधले

पुस्तकाची अधिक माहिती इथे पहाता येईल.

Monday, 8 June 2020

इसापनीती :१ लेखक : आनंद साधले

सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांमधे मिळणार नाही.

ह्या पुस्तकाचा काही भाग बुकगंगाच्या संकेस्थळावर वाचता  येईल. त्यासाठी खालील दुवा पहा.


इसापनीती :१  लेखक : आनंद साधले


मराठी माध्यमात शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ह्या कथा स्वतःहून वाचाव्यात आणि कोणती कथा आवडली , का आवडली हे त्यांनी आपल्या पालकांना सांगावे.

 ह्या वयोगटातील ज्या मुलांना इयत्ता तिसरीचे पाठ्यपुस्तक वाचून समजत असेल त्यांच्या पालकांनी मुलांना ह्या कथा वाचून दाखवू नये.


Saturday, 30 May 2020

साने गुरुजींनी लिहिलेले बालसाहित्य

थिंकमहाराष्ट्र.कॉम सादर करीत आहे
साने गुरुजींचे समग्र साहित्य
*******************
कथा:

सत्त्वशील राजा

***
मधुराणी
*******************

साने गुरुजींनी लिहिलेले बालसाहित्य
सुंदर पत्रे


*******************
मुख्यपान :

http://www.saneguruji.net/

Monday, 25 May 2020

बालकोश खंड १ ( 'अगं अगं म्हशी' ते 'घे रे देवाची संगत')



' बालकोश खंड १ ' ह्या पानावर मुलांसाठी लिहिलेल्या अनेक गोष्टी वाचता येतील आणि अनेक गोष्टी ऐकताही येतील.
कृपया खालील दुवा पहा.
http://www.marathibalkosh.in/index.php/balkumar-kosh


*******************



डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन आणि कल्चरल ट्रस्टतर्फे 'घराघरात बालकोश' या संकेतस्थळाची निर्मिती होत आहे. डॉ. निशिगंधा वाड आणि डॉ. विजया वाड निर्मिती करीत आहेत.
'मुंबई पोर्ट ट्रस्ट' याचे प्रमुख प्रायोजक आहेत आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्याच शुभेच्छांनी हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे.

Sunday, 24 May 2020

गडांची नावे ओळखा






ज्ञान, मनोरंजन, वैचारिक...सर्वकाही मराठीत...
 फक्त inmarathi.com वर...!

इनमराठीचे फेसबुकवरचे पान पहायला खालील दुव्यावर क्लिक करा.

https://www.facebook.com/InMarathi.page/

Saturday, 23 May 2020

' पक्षी जगत प्रश्नमंजुषा ' भाग-२ मध्ये सहभागी व्हा



इंटरनेट वापरून काही माहिती शोधताना भाषिक कौशल्ये विकसित होत असतात.

ह्यासाठी एखादी ऑनलाईन प्रश्नमंजुषा (quiz) सोडवणे हा उपक्रम करता येईल.

****
शिल्पा व राजेंद्र गाडगीळ ,निसर्गमित्र - जळगाव, ह्यांनी
पक्षी जगत प्रश्नमंजुषा बनवलेली आहे.

******************************
*काय प्रश्नमंजुषा सोडवली?*
*पुढे सर्वत्र पाठवली?*
*मग लागा कामाला*
*
**पक्षी जगत प्रश्नमंजुषा ' भाग-२ मध्ये सहभागी व्हा*
*आणि सहभागाचे ** *प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवा.*
*
*त्यासाठी आपला ईमेल आयडी आवश्यक*
*प्रश्नमंजुषेची लिंक आपल्या मित्र,मैत्रीणी व स्नेहीं व विद्यार्थ्यांना पाठवा.*
*प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी वयोमर्यादा नाही*
निर्मिती :- शिल्पा व राजेंद्र गाडगीळ ,निसर्गमित्र - जळगाव,
मो.क्र. 8999809416 / 9370256552
https://forms.gle/cFpmXUgCVpz1DyhW6

वरील दुवा वापरून एक गूगल फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर प्रश्नमंजुषा दिसेल.

Thursday, 21 May 2020

पुस्तकं अज्जिबात न वाचणाऱ्या मीनाची गोष्ट





Song within a tale |



गोष्टीत दडलेली गाणी या उपक्रमातली आजची गोष्ट आहे,
'पुस्तक न वाचणारी मुलगी'


वरील दुव्यावर क्लिक करून व्हिडियो पहा.


उपक्रमाबद्दल-

गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. आपण सगळेच नेहमी गोष्टी सांगत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. पण गोष्टीत गाणीसुध्दा दडलेली असतात, तुम्ही शोधली आहेत का ही गाणी? . या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या लेखकांच्या, प्रकाशकांच्या गोष्टी, पुस्तकं तर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच पण त्याचबरोबर आम्ही या गोष्टीत दडलेली 'गाणी'सुध्दा ऐकवणार आहोत. सोबत भरपूर चित्रही आहेत.चला मग ऐकूया गोष्टी. . आज गोष्ट सांगणार आहे श्रुती प्रदीपकिशोर, गोष्टीत दडलेली गाणी लिहीली आहेत अमोल पाटील यांनी, संगीत दिलंय आणि गाणीसुध्दा म्हणलीयेत मंदार कमलापूरकर यांनी, आणि सोबत गाणं म्हणायलाही भरपूर लोकं आहेत.


Meet & know more about us:- https://m.facebook.com/TheatreTales/?ref=bookmarks

Wednesday, 20 May 2020

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी व इतर शिक्षणकर्मींसाठी बनवलेला ब्लॉग

 मागची अनेक वर्षे मी हा ब्लॉग वापरत नव्हतो.
आता लॉकडाऊनमधे पालक, शिक्षक थेट भेटू शकत नसल्यामुळे ह्या ब्लॉगवर शिक्षणविषयक मजकूर पोस्टणे मी परत सुरू केले आहे.

घरात शिरला उंदीर

घरात शिरला उंदीर

Translated by Mukund Taksale
Original story Mouse in the House by Sowmya Rajendran
Illustrated by Tanaya Vyas