देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी कदाचित उपयोगी पडतील अशा दोन इ-लर्निंगच्या साधनांचे दुवे खाली दिले आहेत.
माझ्या महितीनुसार मराठी शाळांमध्ये साधारणपणे इयत्ता दुसरी, तिसरी पर्यंत मराठी अक्षरओळख व प्राथमिक वाचन-आकलन जमणे अपेक्षित असते. मात्र इयत्ता चौथीपासून पुढच्या विद्यार्थ्यांनाही अक्षरओळख शिकण्यासाठी पूरक मार्गदर्शनाची गरज असते असे अनेकदा दिसून येते. ह्यासाठी संगणकाचा/इ-लर्निंगचा वापर कितपत शक्य आहे ते तपासून बघायला हवे.
देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी कदाचित उपयोगी पडतील अशा दोन साधनांचे दुवे खाली दिले आहेत.
http://www.avashy.com/hindiscripttutor.htm
http://www.digitaldialects.com/Hindi/alphabet.htm
ह्या पद्धतीसंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. ह्याबाबत काही माहिती मिळाली तर कृपया मला कळवा.
- देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी अॅनिमेशन किंवा इतर इ-लर्निंगची एकूण किती साधने उपलब्ध आहेत?
- त्यांची सूची मिळू शकते का?
- त्यातील किती साधने उत्तम किंवा मध्यम गुणवत्तेची आहेत? असा तुलनात्मक अभ्यास झालेला आहे का?
- अशा साधनांचा शाळांमध्ये वापर केल्याचे अनुभव सांगणारे अहवाल मिळू शकतात का?
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.