Wednesday, 30 October 2013

शाळाबाह्य विजय तेंडुलकर



 ' तें ' दिवस ह्या पुस्तकात तेंडुलकरांनी  त्यांच्या आयुष्याच्या आरंभकाळातील अनुभव सांगितले आहेत. 
शाळेत शिकत असताना तेंडुलकरांनी मध्येच - घरी न सांगता - शाळेत जाणे सोडून दिले होते. त्याचे कारण व ह्या काळातले अनुभव खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील. 
तेंडुलकरांचे शब्द साधे असतात पण त्याचा परिणाम कसा होतो हे ह्या लेखातून समजते.

Sunday, 27 October 2013

दगड आणि माती - मंगळावरची !

APOD (Astronomy Picture of the Day) खजिन्यातील अजून एक प्रतिमा-

मंगळ ग्रहावरील जमीन दाखवणारी ही प्रतिमा आहे.

स्पिरीट रोव्हर आणि अपोर्च्युनिटी रोव्हर ह्या दोन स्वयंचलित गाड्या  नासा ह्या संस्थेने मंगळ ग्रहावर  पाठवल्या होत्या. 

मराठीतील ई-साहित्य


ई साहित्य प्रतिष्ठान. 


  ई-साहित्य प्रतिष्ठानची ई-पुस्तकं महाजालावर (इंटरनेटवर) तसेच स्मार्ट मोबाईलवर वाचता येतात. ई साहित्य प्रतिष्ठानची ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत.  ई-माध्यमातून मराठीतील वाचनीय साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा एक लक्षणीय प्रयत्न आहे.
उदाहरणासाठी पुढील दोन पुस्तके पहा. 

Monday, 21 October 2013

माझी शाळा - ज्ञानरचनावादाचा अनुभव देणारी एक मनोरंजक मालिका


‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली ४० भागांची मालिका आहे. 

ही मालिका २० ऑक्टोबर २०१३ पासून दर रविवारी सकाळी ९:३० वाजता दाखवली जाईल.
त्याच भागाचं पुनर्प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होईल.

 ' माझी शाळा ' ह्या मालिकेचे भाग ज्ञानसंरचनावाद ह्या संकल्पनेवर आधारित असतील व ते गोष्टींच्या स्वरुपात मांडले जातील.

Sunday, 20 October 2013

' संचालक- बालचित्रवाणी ' हे पद शिक्षण आयुक्त या पदात रूपांतरित



 शिक्षण आयुक्त हे नवीन पद  महाराष्ट्रात सुरू होणार ह्यावरील एक बातमी पूर्वी ह्या ब्लॉगवर दिली होती. आता अधिक तपशिलात दोन बातम्या आल्या आहेत. 

अजून एक बातमी बालभारती आणि बालचित्रवाणी या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाबाबत आहे. 


*******

 २००३ पासून आतापर्यंत राज्यात ८ शिक्षण संचालक काम करत होते. यांतील 'संचालक- राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी)' हे पद शिक्षण आयुक्त या पदात रूपांतरित करण्यात आले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमधून या पदाची नेमणूक करण्यात येणार आहे. विभागातर्फे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात ही माहिती देण्यात आली आहे. 
 -   लोकसत्ता,  २० ऑक्टोबर २०१३

 ***********
  
शालेय शिक्षण विभागाच्या या नवीन निर्णयामुळे राज्यात सध्या विविध प्रकारच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणा-या प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, अल्पसंख्याक व प्रौढशिक्षण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पाठय़पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती), राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या आठ मंडळांना आता आपले कोणतेही स्वतंत्र अधिकार उरणार नाहीत. 
-    प्रहार, १९ ऑक्टोबर २०१३
                 
**********

महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी (बालचित्रवाणी) या दोन संस्था एकत्रीकरणाचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन असून या दोन्ही संस्थांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केला असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
  -   लोकसत्ता,  २० ऑक्टोबर २०१३


***********

पूर्ण बातम्या वाचायला खालील दुवे पहा.

शिक्षण संचालकांवर आता शिक्षण आयुक्तांची 'नजर'! 
-  लोकसत्ता,  २०/१० /१३


आठ शिक्षण मंडळांसाठी यापुढे एकच आयुक्त 
-प्रहार, १९/१०/१३



बालभारती व बालचित्रवाणी एकत्र करण्याचा प्रस्ताव 
-  लोकसत्ता,  २०/१० /१३




Saturday, 19 October 2013

कोणी किती दिवे लावलेत ?

नवलाख तळपती दीप विजेचे येथ 

                              उतरली तारकादळे जणू नगरात   - कुसुमाग्रज

 
रात्रीच्या वेळी आकाशातून पृथ्वीकडे पाहिल्यावर काही भाग लखलख चंदेऱी दिसतात तर काही भागात अंधार दिसतो.  कोणता भाग किती 'विकसित ' आहे आहे हे नुसते डोळ्यांनी बघून समजते. 

रात्रीचे जग दाखवणारी एक प्रतिमा नासाच्या डिएमएसपी उपग्रहातून घेतलेले फोटो एकत्र करून बनवलेली आहे.

Thursday, 17 October 2013

शनिवारी पहाटे दिसेल छायाकल्प चंद्रग्रहण

 
बहुतेक जणांनी पाहिलेल्या चंद्रग्रहणात चंद्राचा रंग काळसर तपकिरी असतो.
शनिवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी दिसणा-या चंद्रग्रहणात मात्र चंद्र काळसर तपकिरी  दिसणार नाही तर त्याचा प्रकाश थोडा फिकट झालेला दिसेल. ह्याचे कारण समजावून घेऊ.


Tuesday, 15 October 2013

नाटक आणि खगोलशास्त्र

नाटकांचा वापर करून मुले खगोलशास्त्र समजून घेतील व इतरांनाही समजवून सांगतील. मुलांपैकी एकेक जण पृथ्वी, सूर्य व चंद्र वगैरे बनेल व ही सर्व मुले मिळून एक खेळ करून दाखवतील . 

Saturday, 12 October 2013

खगोल खजिना - शनी ग्रहाची कडी, पृथ्वी आणि चंद्र



मागील एका  लेखात खगोलशास्त्राशी संबंधित काही संकेतस्थळांची माहिती होती. त्यातील एक होते APOD .

APOD म्हणजे Astronomy Picture of the Day.

 खगोलशास्त्राशी संबंधित एक नवीन चित्र रोज इथे पहाता येते.


Friday, 11 October 2013

उपक्रम दिवाळी विशेषांक २०१२ - महाजालावरील दिवाळी अंक

अजून एक दोन आठवड्यात २०१३ सालचे दिवाळी अंक प्रकाशित होतील. अलिकडे महाजालावरही (बिनाकागदाचे) दिवाळी अंक प्रकाशित होतात. उदाहरणासाठी गेल्या वर्षीचा प्रकाशित झालेला ' उपक्रम ' हा अंक पहा. 

ह्यातील लेखांचे वेगळेपणही लक्षात घ्या. एका लेखात वेगवेगळ्या प्रकारच्या पंपांबद्दल माहिती हिलेली आहे. अशी तपशीलवार तांत्रिक माहिती सहसा मराठीत वाचायला मिळत नाही.

ह्या वर्षीही महाजालावरचे दिवाळी अंक वाचा आणि इतरांना कळवा.

जळगाव - ७० टक्के शाळा ‘ढ’ ! ?

जळगाव जिल्हा परिषदेच्या सुमारे ७० टक्के शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत अतिशय कच्च्या स्वरुपाच्या असल्याचे आढळून आले आहे. --- १० ऑक्टोबर २०१३

Tuesday, 1 October 2013

महात्म्याशी भेट आणि शिक्षणाचे जादुभरे बेट

गांधी जयंतीनिमित्त डॉ. अभय बंग ह्यांच्या दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत. जरूर वाचा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.

 

महात्म्याशी भेट


शिक्षणाचे जादुभरे बेट