मागील एका लेखात
खगोलशास्त्राशी संबंधित काही संकेतस्थळांची माहिती होती. त्यातील एक होते APOD .
APOD म्हणजे
Astronomy Picture of the Day.
खगोलशास्त्राशी संबंधित एक नवीन चित्र रोज इथे पहाता येते.
ही चित्रे नासाच्या संकेतस्थळावर असतात व ह्यातील अनेक प्रतिमा अंतराळयानातून घेतलेल्या असतात.
अशाच काही प्रतिमांचे दुवे इथे दिलेले
आहेत.
खालील दुवा पहा. दोन प्रतिमा दिसतील. दोन्ही
प्रतिमा दोन अंतराळयानांनी एकाच दिवशी काढलेल्या आहेत.
डावीकडील प्रतिमेत शनी ग्रहाच्या कड्यांचा काही भाग दिसतोय . ह्या कड्यांच्या खाली बाणाने दाखवलेला निळा ठिपका म्हणजे आपली पृथ्वी आहे. शनीच्या कड्यांना इतक्या स्पष्टपणे दाखवणारी अशी प्रतिमा एखाद्या अंतराळयानाकडून मिळते हे अविश्वसनीय वाटू शकेल.
डावीकडील प्रतिमेत शनी ग्रहाच्या कड्यांचा काही भाग दिसतोय . ह्या कड्यांच्या खाली बाणाने दाखवलेला निळा ठिपका म्हणजे आपली पृथ्वी आहे. शनीच्या कड्यांना इतक्या स्पष्टपणे दाखवणारी अशी प्रतिमा एखाद्या अंतराळयानाकडून मिळते हे अविश्वसनीय वाटू शकेल.
ही प्रतिमा कॅसिनी ह्या अंतराळयानामुळे मिळाली आहे.
उजवीकडील प्रतिमेत बुध ग्रहावरून दिसणारे पृथ्वी व चंद्र दिसत आहेत. ही प्रतिमा मेसेंजर ह्या अंतराळयानामुळे मिळाली आहे.
उपग्रहातून दिसणारी पृथ्वी
ह्या पैकी एक आहे २२
सप्टेंबर रोजी उपग्रहातून मिळालेली पृथ्वीची प्रतिमा. पृथ्वीपासून
३६,०० किलेमीटर अंतरावरून ही प्रतिमा एका ऱशियन उपग्रहाने घेतलेली आहे.
ह्यात भारत देश कसा अगदी समोर दिसतो
आहे.
अशाच अनेक प्रतिमा एकत्र करून तयार केलेला ही चित्रफीत पहा.
२२ सप्टेंबरला पृथ्वीचा आस सूर्याच्या दिशेने किंवा सूर्यापासून दूर झुकलेला नसतो. त्यामुळे सूर्यप्रकाश दोन्ही ध्रुवांपर्यंत पोचू शकतो हे अशा प्रतिमांमधून दिसते.
चित्रफितीमध्ये विषुववृत्तावरून जाणारा
प्रकाशित भाग बारकाईने पहा. सूर्य व उपग्रह ह्या ठिकाणी ह्यावेळी
बरोबर 'डोक्यावर ' असणार !
विज्ञान,
भूगोल शिकवण्यासाठी अशा प्रतिमा खूप
उपयुक्त आहेत.
सर,
ReplyDeleteपृथ्वीची इतकी सुंदर प्रतिमा आहे ही. आणि पृथ्वीवर होणा-या दिवस रात्रीची चित्रफित तर अफलातून आहे. मुलांनाच काय मोठ्यांना तरी असा नयनरम्य देखावा कुठे पाहायला मिळतो. तुमच्या ब्लॉगमुळे इतकी चांगली माहिती रंगित फोटोंसहीत इथे इपलब्ध होऊ शकली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Information Very important
ReplyDelete