ई साहित्य प्रतिष्ठान.
ई-साहित्य
प्रतिष्ठानची ई-पुस्तकं महाजालावर (इंटरनेटवर) तसेच स्मार्ट मोबाईलवर वाचता येतात. ई साहित्य प्रतिष्ठानची
ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. ई-माध्यमातून मराठीतील वाचनीय साहित्य उपलब्ध
करून देण्याचा हा एक लक्षणीय प्रयत्न आहे.
उदाहरणासाठी पुढील दोन पुस्तके पहा.
एक पुस्तक आहे वेरूळ येथील शिल्पकलेवर.
दुसरे पुस्तक आहे सरसगड व कळसूबाई येथे केलेल्या भटकंतीचे .
हे दुसरे पुस्तक डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अर्पण केले आहे व त्याचे प्रकाशन सर्वपित्री अमावास्येला केले होते.
पुस्तक वाचताना वरील बाजूस उजवीकडे पुस्तक उतरवून घेण्याची (डाऊनलोड) सुविधा दिलेली आहे ती पहा.
www.esahity.com या संकेतस्थळावर हा पुस्तकांचा खजिना आहे.
डॉ. मुरलीधर जावडेकरांनी आपली
सर्व २५ पुस्तकं ई वितरणासाठी मराठी वाचकांना विनामूल्य उपल्ब्ध करून दिली आहेत. इतर साहित्यिकांनीदेखील आपली पुस्तके ई-प्रसारणासाठी
विनामूल्य उपलब्ध करून द्यावीत असे आवाहन इ-साहित्यने केल आहे.
इ-साहित्यने वाचकांना केलेली विनंती-
' वाचकांनीही आपल्या ओळखीच्या आठ ते दहा वाचकांचे ई-मेल पत्ते इ-साहित्यला कळवावे.
आज पावणेदोन लाखांच्या घरात असलेला ई-साहित्य प्रतिष्ठानचा वाचकवर्ग लवकरच दहा ते बारा लाखांपर्यंत पोहोचावा हे उद्दिष्ट आहे.
बारा लाख म्हणजे फ़ार नाही. बारा कोटी मराठी माणसाचा फ़क्त एक टक्का. तेवढे तरी वाचक आपण जमा करूया.
त्यांना नवीन आणि जुन्या चांगल्या लेखकांचे भारी भारी साहित्य देऊया. वाचन संस्कृतीला मोबाईलच्या स्मार्ट युगात नेऊया.'

संपर्क - esahity@gmail.com
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.