Sunday, 20 October 2013

' संचालक- बालचित्रवाणी ' हे पद शिक्षण आयुक्त या पदात रूपांतरित



 शिक्षण आयुक्त हे नवीन पद  महाराष्ट्रात सुरू होणार ह्यावरील एक बातमी पूर्वी ह्या ब्लॉगवर दिली होती. आता अधिक तपशिलात दोन बातम्या आल्या आहेत. 

अजून एक बातमी बालभारती आणि बालचित्रवाणी या दोन संस्थांच्या एकत्रीकरणाबाबत आहे. 


*******

 २००३ पासून आतापर्यंत राज्यात ८ शिक्षण संचालक काम करत होते. यांतील 'संचालक- राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी)' हे पद शिक्षण आयुक्त या पदात रूपांतरित करण्यात आले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमधून या पदाची नेमणूक करण्यात येणार आहे. विभागातर्फे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात ही माहिती देण्यात आली आहे. 
 -   लोकसत्ता,  २० ऑक्टोबर २०१३

 ***********
  
शालेय शिक्षण विभागाच्या या नवीन निर्णयामुळे राज्यात सध्या विविध प्रकारच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणा-या प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, अल्पसंख्याक व प्रौढशिक्षण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पाठय़पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ (बालभारती), राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी) आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या आठ मंडळांना आता आपले कोणतेही स्वतंत्र अधिकार उरणार नाहीत. 
-    प्रहार, १९ ऑक्टोबर २०१३
                 
**********

महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी (बालचित्रवाणी) या दोन संस्था एकत्रीकरणाचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन असून या दोन्ही संस्थांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केला असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
  -   लोकसत्ता,  २० ऑक्टोबर २०१३


***********

पूर्ण बातम्या वाचायला खालील दुवे पहा.

शिक्षण संचालकांवर आता शिक्षण आयुक्तांची 'नजर'! 
-  लोकसत्ता,  २०/१० /१३


आठ शिक्षण मंडळांसाठी यापुढे एकच आयुक्त 
-प्रहार, १९/१०/१३



बालभारती व बालचित्रवाणी एकत्र करण्याचा प्रस्ताव 
-  लोकसत्ता,  २०/१० /१३




No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.