नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात - कुसुमाग्रज
रात्रीच्या वेळी आकाशातून पृथ्वीकडे पाहिल्यावर काही भाग लखलख चंदेऱी दिसतात तर काही भागात अंधार दिसतो. कोणता भाग किती 'विकसित ' आहे आहे हे नुसते डोळ्यांनी बघून समजते.
ह्या प्रतिमेत उत्तर अमेरीका,युरोप, जपान कसे लखलखत आहेत. दक्षिण अमेरीका, आफ्रिका ह्या खंडांचा बराचसा भाग अंधारात आहे.
आशिया खंडातला भारतही ब-यापैकी प्रकाशित दिसतोय. मुंबई,दिल्ली सारख्या शहरांजवळचे भाग लखलखण्यात उत्तर अमेरीका,युरोपच्या खूप मागे नाहीत.
जगाचा नकाशा समजून घ्यायला तसेच औद्योगिक प्रगती, गरीब व श्रीमंत देश, विजेचा वापर, विकास म्हणजे काय अशा अनेक विषयांचा अभ्यास करताना ही प्रतिमा उपयोगी पडेल. खाली दिलेला दुवा पहा.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.