Sunday, 27 October 2013

दगड आणि माती - मंगळावरची !

APOD (Astronomy Picture of the Day) खजिन्यातील अजून एक प्रतिमा-

मंगळ ग्रहावरील जमीन दाखवणारी ही प्रतिमा आहे.

स्पिरीट रोव्हर आणि अपोर्च्युनिटी रोव्हर ह्या दोन स्वयंचलित गाड्या  नासा ह्या संस्थेने मंगळ ग्रहावर  पाठवल्या होत्या. 


१० जून  व ७ जुलै २००३ रोजी पृथ्वीवरून सोडलेल्या ह्या स्वयंचलित भटकगाड्या ३ व २४ जानेवारी २००४ ला मंगळावर पोचल्या. 
तिथे फिरून त्यांनी मंगळाच्या जमिनीची भूगर्भशास्त्रीय माहिती मिळवली व अनेक फोटो काढले. 
स्पिरीट रोव्हरने एका टेकडीवर चढून काढलेले काही फोटो वापरून मंगळावरील जमीन दाखवणारी खालील प्रतिमा तयार केलेली  आहे.

ही प्रतिमा लहान आकारात पहा तसेच पूर्ण मोठी करूनही पहा. 

माऊसच्या हालचालीनुसार भिंगाची खूण असलेले चिन्ह प्रतिमेवर फिरताना दिसेल ते वापरून प्रतिमा मोठी किंवा लहान करा. 
प्रतिमेखाली व डावीकडे असलेल्या सरकपट्ट्या (स्क्रॉलबार ) वापरून ह्या मोठ्या प्रतिमेचा सर्व भाग पहा.




मंगळावरील रोव्हर गाड्यांविषयी इंग्रजी माहितीसाठी खालील दुवा पहा.



No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.