Thursday 12 September 2013

आयसॉन : एक तेजस्वी धूमकेतू

डावीकडचा फोटो आयसॉन ह्या धूमकेतूचा आहे.   
आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून आलेला हा ' बर्फाळ पाहुणा ' आता सूर्याच्या दिशेने जातो आहे.
२०१३ ह्या वर्षी ११ ते १५ नोव्हेंबरपासून डिसेंबरअखेरपर्यंत हा धूमकेतू आकाशात दुर्बिणीशिवायही पाहता येईल अशी शक्यता आहे.

आयसॉन ह्या नावाचा अर्थ काय?


इंटरनॅशनल सायंटिफिक ऑप्टीकल नेटवर्क 
(International Scientific Optical Network) 
हा  वेधशाळांचा (observatories) एक गट आहे. 
 ह्या गटाकडून हा धूमकेतू शोधला गेल्यामुळे  त्याला ' आयसॉन ' (ISON) हे नाव पडले.   C/2012 S1  हे ह्या धूमकेतूचे अधिकृत नाव आहे.  
 
आयसॉन गटाच्या वेधशाळांमधील दुर्बिण वापरून रशियामध्ये खगोल वैज्ञानिकांनी सप्टेंबर २०१२ रोजी हा धूमकेतू शोधला. त्यावेळी हा धूमकेतू साधारणपणे गुरू व शनी ह्या ग्रहांच्या मध्ये होता.
 



Image Credit: NASA, ESA, J.-Y. Li (Planetary Science Institute), and the Hubble Comet ISON Imaging Science Team


वरील फोटो कोणी काढला आहे?

नासा ह्या संस्थेची  'हबल स्पेस टेलिस्कोप'  ही एक विशाल दुर्बीण अंतराळात आहे. डावीकडे दाखवलेला आयसॉनचा फोटो ह्या टेलिस्कोपमधून घेतलेला आहे. धूमकेतूच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी ह्या फोटोवर संगणकाद्वारे प्रक्रिया केलेली आहे.   
हा फोटो १० एप्रिल २०१३ रोजी घेतलेला आहे. ह्यावेळी आयसॉन धूमकेतू सूर्यापासून सुमारे ६२४ दशलक्ष किलोमीटर व पृथ्वीपासून सुमारे ६३४ दशलक्ष किलोमीटर अंतरावर होता.
१ व २ ऑक्टोबर २०१३ ला आयसॉन धूमकेतू मंगळ ग्रहाजवळ सुमारे ११ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोचला होता. 

     आयसॉन धूमकेतू कुठे दिसेल?
ऑक्टोबर महिन्यात  ८ ते १२ इंचाचा टेलिस्कोप वापरून पूर्वेच्या आकाशात उजाडण्याआधी आयसॉन धूमकेतू बघता येईल.   

आयसॉनचे आकाशातील स्थान समजण्यासाठी सोपी केलेली आकृती (आकार व अंतरे प्रमाणात नाहीत.)



१५ ते २० ऑक्टोबरपर्यंत  उजाडण्याआधी पूर्वेच्या आकाशात सिंह राशीतील रेग्युलस ह्या तेजस्वी ता-याजवळ  व मंगळ ग्रहाच्या जवळच आयसॉन दिसत होता.
१  नोव्हेंबरपासून पुढचे काही दिवस आयसॉन धूमकेतू मंगळ ग्रहाच्या पुढे  बुध ग्रह व कन्या राशीच्या (Virgo) दिशेने जाताना दिसेल. तो क्षितिजाजवळ असला तरी त्याच्या 'शेपटी 'मुळे तो ओळखता येईल.                        
Credit: NASA/JPL/University of Arizona
Credit: NASA/JPL/University of Arizona
हा धूमकेतू मिनीटाला सुमारे २५०० किलोमीटरच्या वेगाने सूर्याच्या जवळ जातो आहे. 
२८ नोव्हेंबरला आयसॉन सूर्याजवळून १२ लाख किलोमीटर अंतरावरून जाईल.  हे अंतर पृथ्वीवरील मानवी व्यवहारात खूप जास्त वाटत असले तरी सूर्यापासून बाहेर पडणारी उर्जा व सूर्याचे गुरुत्वाकर्षण  ह्यामुळे आयसॉनचे लहान लहान तुकडे होऊ शकतात. 
ह्यावेळी आयसॉन नष्ट झाला नाही  तर एक तेजस्वी धूमकेतू म्हणून तो आपल्याला दिसू शकेल. ह्यावेळी तो शुक्राएवढा तेजस्वी असेल. सूर्याजवळ असला तरी दिवसाच्या प्रकाशात तो दिसू शकेल.

ह्यानंतर त्याचा तेजस्वीपणा हळूहळू कमी होत जाईल पण तो दुर्बिणीशिवायही बघता येईल. इथून पुढे ३१ डिसेंबरपर्यंत सकाळी उजाडण्याच्या वेळेस पूर्वेला दरदिवशी थोडा वरच्या जागी आयसॉन धूमकेतू दिसेल.
आयसॉनची ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा. आपले प्रश्न व सूचना आम्हाला खालील इमेलवर कळवा.
gshikshan@gmail.com


इंग्रजीतील पोस्टर-
आयसॉन पोस्टर

इंग्रजीतील व्हिडीयो -  
ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळातील आयसॉनचा संभाव्य प्रवास

आयसॉनचे इतर फोटो

१. भारतात लडाख येथील हन्ले गावात IAO (इंडियन अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी - Indian Astronomical Observatory ) ही वेधशाळा आहे. इथे हिमालयन चंद्र हा टेलिस्कोप आहे. ह्या टेलिस्कोपमधून 


 अशा अनेक प्रतिमा एकत्र करून दिसणारा  



२.  आयसॉन मंगळ ग्रहाजवळून जात असताना २९ सप्टेंबर २०१३ रोजी तेथील अवकाशयानावरील 



३.  ८ ऑक्टोबर २०१३ ला  अॅरीझोना विद्यापीठाच्या   

काही मराठी बातम्या


 आयसॉन धूमकेतू पाहण्याची संधी-  २ ऑक्टोबर २०१३, सकाळ

 ‘आयसॉन’ धूमकेतू दिसणार  - २८ सप्टेंबर २०१३,महाराष्ट्र टाईम्स.

  नेत्रदीपक धूमकेतू -१४ जुलै २०१३, सामना


शतकातील सर्वात तेजस्वी धूमकेतू?-  २५ एप्रिल २०१३,महाराष्ट्र टाईम्स.

चंद्रापेक्षाही प्रकाशमान महाधूमकेतू दिसणार - २७ डिसेंबर २०१२, सकाळ

२०१३ मध्ये भेटीस येणार महाधूमकेतू - २६ डिसेंबर २०१२, लोकसत्ता


 संबंधित माहितीसाठी काही दुवे-


आयसॉन धूमकेतूवर लक्ष ठेवा. (eyes on comet ISON)


धूमकेतू म्हणजे काय?अवकाशवेध.कॉम


हबल टेलिस्कोपविषयी मराठीतील माहिती

हिमालयन चंद्र टेलिस्कोपबाबत इंग्रजी माहिती  

हायराईज कॅमे-याने काढलेल्या फोटोबाबत इंग्रजी माहिती

आयसॉनच्या प्रवासाची इंग्रजीतील माहिती

नासाच्या संकेतस्थळावरील आयसॉन ह्या धूमकेतूचा फोटो व इंग्रजीतील माहिती





No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.