Showing posts with label शिक (व) णे. Show all posts
Showing posts with label शिक (व) णे. Show all posts

Friday, 8 May 2015

जसे सापळे तशा सुटका

'विचार करण्याची कला' अशीही एक कला असते. 
प्रत्येकाकडे ती काहीशी असतेच, पण फक्त माहिती व ज्ञान नव्हे, 
तर मर्मदृष्टीसाठी ती आवर्जून जोपासायला हवी.

राजीव सानेंच्या लेखांवरील एक ब्लॉग सुरू झालेला आहे. त्या ब्लॉगवरील एका लेखाचा दुवा  खाली दिलेला आहे.


ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टांत, आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे....


जसे सापळे तशा सुटका - राजीव साने

Sunday, 18 January 2015

देवनागरी अक्षरओळख : इ-लर्निंगची साधने


देवनागरी लिपीतील अक्षरओळख शिकण्यासाठी कदाचित उपयोगी पडतील अशा दोन इ-लर्निंगच्या साधनांचे दुवे खाली दिले आहेत.  

Wednesday, 14 May 2014

कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning)


कृतीयुक्त अध्ययन पद्धती (Activity Based Learning) समजून घेण्यासाठी एका लघुपटाची मदत होऊ शकेल.

हा लघुपट पुणे जिल्ह्यातील केंजळ गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील कामावर आधारीत  आहे.

श्री.जयगोंडा पाटील ह्यांनी ह्या लघुपटाचा दुवा पाठवलेला आहे.

कृतीयुक्त अध्ययन पद्धती - केंजळ, पुणे



Saturday, 30 November 2013

माझी शाळा - काही भाग


‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली मालिका आहे. 

ह्या मालिकेचा पहिला  भाग खालील दुव्यावर पाहता येईल. 

Wednesday, 30 October 2013

शाळाबाह्य विजय तेंडुलकर



 ' तें ' दिवस ह्या पुस्तकात तेंडुलकरांनी  त्यांच्या आयुष्याच्या आरंभकाळातील अनुभव सांगितले आहेत. 
शाळेत शिकत असताना तेंडुलकरांनी मध्येच - घरी न सांगता - शाळेत जाणे सोडून दिले होते. त्याचे कारण व ह्या काळातले अनुभव खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील. 
तेंडुलकरांचे शब्द साधे असतात पण त्याचा परिणाम कसा होतो हे ह्या लेखातून समजते.

Monday, 21 October 2013

माझी शाळा - ज्ञानरचनावादाचा अनुभव देणारी एक मनोरंजक मालिका


‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली ४० भागांची मालिका आहे. 

ही मालिका २० ऑक्टोबर २०१३ पासून दर रविवारी सकाळी ९:३० वाजता दाखवली जाईल.
त्याच भागाचं पुनर्प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होईल.

 ' माझी शाळा ' ह्या मालिकेचे भाग ज्ञानसंरचनावाद ह्या संकल्पनेवर आधारित असतील व ते गोष्टींच्या स्वरुपात मांडले जातील.