Wednesday, 30 October 2013

शाळाबाह्य विजय तेंडुलकर



 ' तें ' दिवस ह्या पुस्तकात तेंडुलकरांनी  त्यांच्या आयुष्याच्या आरंभकाळातील अनुभव सांगितले आहेत. 
शाळेत शिकत असताना तेंडुलकरांनी मध्येच - घरी न सांगता - शाळेत जाणे सोडून दिले होते. त्याचे कारण व ह्या काळातले अनुभव खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येतील. 
तेंडुलकरांचे शब्द साधे असतात पण त्याचा परिणाम कसा होतो हे ह्या लेखातून समजते.

Sunday, 27 October 2013

दगड आणि माती - मंगळावरची !

APOD (Astronomy Picture of the Day) खजिन्यातील अजून एक प्रतिमा-

मंगळ ग्रहावरील जमीन दाखवणारी ही प्रतिमा आहे.

स्पिरीट रोव्हर आणि अपोर्च्युनिटी रोव्हर ह्या दोन स्वयंचलित गाड्या  नासा ह्या संस्थेने मंगळ ग्रहावर  पाठवल्या होत्या. 

मराठीतील ई-साहित्य


ई साहित्य प्रतिष्ठान. 


  ई-साहित्य प्रतिष्ठानची ई-पुस्तकं महाजालावर (इंटरनेटवर) तसेच स्मार्ट मोबाईलवर वाचता येतात. ई साहित्य प्रतिष्ठानची ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली आहेत.  ई-माध्यमातून मराठीतील वाचनीय साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा एक लक्षणीय प्रयत्न आहे.
उदाहरणासाठी पुढील दोन पुस्तके पहा. 

Monday, 21 October 2013

माझी शाळा - ज्ञानरचनावादाचा अनुभव देणारी एक मनोरंजक मालिका


‘माझी शाळा’ ही दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी बनवलेली ४० भागांची मालिका आहे. 

ही मालिका २० ऑक्टोबर २०१३ पासून दर रविवारी सकाळी ९:३० वाजता दाखवली जाईल.
त्याच भागाचं पुनर्प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होईल.

 ' माझी शाळा ' ह्या मालिकेचे भाग ज्ञानसंरचनावाद ह्या संकल्पनेवर आधारित असतील व ते गोष्टींच्या स्वरुपात मांडले जातील.