Saturday 19 October 2013

कोणी किती दिवे लावलेत ?

नवलाख तळपती दीप विजेचे येथ 

                              उतरली तारकादळे जणू नगरात   - कुसुमाग्रज

 
रात्रीच्या वेळी आकाशातून पृथ्वीकडे पाहिल्यावर काही भाग लखलख चंदेऱी दिसतात तर काही भागात अंधार दिसतो.  कोणता भाग किती 'विकसित ' आहे आहे हे नुसते डोळ्यांनी बघून समजते. 

रात्रीचे जग दाखवणारी एक प्रतिमा नासाच्या डिएमएसपी उपग्रहातून घेतलेले फोटो एकत्र करून बनवलेली आहे.

ह्या प्रतिमेत उत्तर अमेरीका,युरोप, जपान कसे लखलखत आहेत. दक्षिण अमेरीका, आफ्रिका ह्या खंडांचा बराचसा भाग अंधारात आहे. 
आशिया खंडातला भारतही ब-यापैकी प्रकाशित दिसतोय. मुंबई,दिल्ली सारख्या शहरांजवळचे भाग लखलखण्यात उत्तर अमेरीका,युरोपच्या खूप मागे नाहीत. 
जगाचा नकाशा समजून घ्यायला तसेच औद्योगिक प्रगती, गरीब व श्रीमंत देश, विजेचा वापर, विकास म्हणजे काय अशा अनेक विषयांचा अभ्यास करताना ही प्रतिमा उपयोगी पडेल. खाली दिलेला दुवा पहा.

 रात्रीची दुनिया


No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.